बस किंवा ट्रेनमध्ये बसायला जागा नसली की, उभं राहणं आपल्या जीवावर येतं. शक्यतो आपण कोणत्याही ठिकाणी उभं राहणं पसंत करत नाही. मात्र नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.या साठी संशोधकानी जवळपास १ हजार १८४ जणांवर अभ्यास केला. ३३ वयोगटातील व्यक्तींचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. यामध्ये ६० टक्के पुरुषांचा समावेश होता.“उभं राहिल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शिवाय शारीरिक हालचालीमुळे स्नायू तंदुरूस्त राहून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. त्यामुळे उभं राहिण्याचे फक्त वजन कमी न होता इतरही फायदे आहेत.”
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews